मतदार जनजागृती प्रभातफेरी चे आयोजन.

पाथरी विधानसभा मतदारसंघ अंतर्गत स्वीप टीम द्वारे ग्रामीण भागात उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी पाथरी मा.शैलेश लाहोटी साहेब, तहसीलदार तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी मा.शंकर हंदेश्वर साहेब,तसेच गटशिक्षणाधिकारी तथा स्वीप टीम नोडल अधिकारी मा.मुकेश राठोड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व धम्मपाल उघडे सर, शंभर धावारे सर व किशन डहाळे सर यांच्या नेतृत्वाखाली प्रभातफेरी काढण्यात आली.सिमुरगव्हाण येथे मंदिरात सर्वांना 100% मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले.तसेच रांगोळी स्पर्धेतून निवडणूकीबाबत जागृती करण्यात आले.दिपोत्सवातून लोकांना लोकशाही बाबत मार्गदर्शन करण्यात आले.


































