सरकारी कामगार अधिकारी कराड यांच्या कामगीरी मुळे बांधकाम कामगार समाधानी
परभणी जिल्हा प्रतिनिधी.परभणी हिंगोली येथे कार्यरत असलेले कर्तव्यदक्ष सरकारी कामगार अधिकारी टि. ई कराड यांची नुकतीच मागील महिन्यात परभणी येथे सरकारी कामगार अधिकारी म्हणून कायमस्वरूपी पदस्थापना देण्यात आली. परभणी जिल्ह्यात कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख असलेले कराड यांची परभणी येथे कायमस्वरूपी पदस्थापना झाल्याबद्दल विविध बांधकाम कामगार क्षेत्रातील सामाजिक संघटना, संस्था व राजकीय नेत्यांनी त्यांचे स्वागत केले.
कर्तव्यदक्ष सरकारी कामगार अधिकारी टि. ई कराड यांनी कामगारांच्या हितासाठी मोठे योगदान आहे. विशेषत: मागील गेल्या ९ महिन्यांपासून परभणी येथे अतिरिक्त पदभार सांभाळत असताना जिल्ह्यात प्रलंबित पात्र अर्ज निकाली काढण्यात आले. विविध समस्यांवर यशस्वीपणे कामकाजाचा आढावा घेऊन पात्र अर्ज निकाली काढुन वंचित बांधकाम कामगारांना न्याय मिळवून दिला.
वर्ष २०१४ पासून कराड हे परभणीत अतिरिक्त पदभार म्हणून स्वीकारले आहे त्यांना परभणी कार्यालयीन कामकाजाचा चांगला अनुभव आहे. मागील कार्यकाळात बांधकाम कामगारांच्या बाबतीत आलेल्या तक्रारींचा निपटारा करुन बांधकाम कामगारांचे प्रश्न सहजतेने सोडवून विविध कल्याणकारी योजनांचे अर्ज निकाली काढत बांधकाम कामगारांना विविध कल्याणकारी योजनांचा लाभ दिल्याने बांधकाम कामगार वर्गात समाधान व्यक्त केले जात आहे.
यापुढे त्यांच्या कार्यकाळात बांधकाम कामगारांचे अडचणी व प्रश्न मार्गी लागतील असा विश्वास परभणी येथील मायनॉरिटी डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन एमडिओ संघटनेचे जिल्हाध्यक्ष सय्यद रफीक पेडगावकर यांनी व्यक्त केले आहे.


































