उपसंपादक अहमद अन्सारी.पाथरी धनगर समाजाचे संघर्ष योद्धे श्री. दीपक भाऊ बोराडे यांना दडपशाहीच्या माध्यमातून अटक करण्यात आल्याचा आरोप करीत सकल धनगर समाज, पाथरी तालुक्याच्या वतीने याचा जाहीर निषेध नोंदवण्यात आला आहे. या संदर्भात दि. १७ जानेवारी २०२६ रोजी तहसीलदार पाथरी यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, श्री. दीपक बोराडे यांचे आंदोलन लोकशाही मार्गाने व पूर्वपरवानगीने सुरू होते. मात्र, तरीही शासनाने त्यांना अटक करून स्थानबद्ध केल्याने महाराष्ट्रातील सकल धनगर समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, असा आरोप करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या काळात सकल धनगर समाज पाथरी तालुक्याच्या वतीने
मतदानावर बहिष्कार टाकण्यात येईल, तसेच विविध सर्कल व गाव पातळीवर लोकप्रतिनिधींना गावबंदी करण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
शासनाच्या या कारवाईचा निषेध म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे नमूद करून, सदर बाबीची अधिकृत नोंद घेण्यात यावी, अशी मागणीही तहसील प्रशासनाकडे करण्यात आली आहे


































