उपसंपादक अहमद अन्सारी पाथरी तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते तथा प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ जगदीश शिंदे यांनी आज काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आ बाबाजानी दुर्रानी यांच्या निवासस्थानी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

काँग्रेस पक्षाला जिल्हाभरात आलेली मरगळ दुर करून हा पक्ष जिल्ह्यात नंबर एक वर आणण्या साठी प्रयत्न करणार म्हणत आ बाबाजानी दुर्रानी यांनी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष पद मिळाल्या पासुन नवतरूणांना सोबत घेत नवी फळी ऊभारण्याचा माणस बोलून दाखवला होता. त्याच दृष्टीने पक्षात नव चैतन्य निर्माण करण्या साठी स्वच्छ चारित्र्याची नवी मजबुत फळी ऊभारण्याचे काम

माजी आ दुर्रानी करतांना दिसून येत आहेत. शनिवारी माजी आ बाबाजीनी दुर्रानी यांच्या उपस्थितीत त्यांच्या निवासस्थानी डॉ जगदीश शिंदे यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला .या वेळी कृउबास चे ऊप सभापती शामराव धर्मे, जि प चे माजी सभापती सुभाष आबा कोल्हे, माजी पं स सदस्य नारायणराव आढाव, दिनेश रनेर आदींची उपस्थिती होती. बाभळगाव जि प गट महिला सर्व साधारण साठी राखीव आहे. या ठिकाणाहुन माजी सभापती सुभाषराव कोल्हे हे
इच्छूक होते. मात्र वाढते वय लक्षात घेता आबांनी थांबण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले जात असून त्यांचे चिरंजिव अनिल कोल्हे हे कान्सूर गणातून निवडणुक रिंगणात ऊतरतील असे सांगितले जात आहे तर. बाभळगाव गटातून डॉ जगदीश शिंदे यांच्या मातोश्री या जिप गटातून काँग्रेस पक्षा कडून निवडणुक रिंगणात ऊतरणार आहेत. तर बाभळगाव गणातून उमेवाराची चाचपणी सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
एकुनच काँग्रेस पक्षाच्या वतीने कासापुरी, लिंबा, बाभळगाव,देवनांद्रा या चार गटात नवतरूनांना संधी दिली असल्याने या येथील ऊमेदवार निश्चित भरगोस मतांनी विजय मिळवतील असा विश्वास काँग्रेसजन व्यक्त करतांना दिसत आहेत. डाॅ जगदीश शिंदे यांच्या काँग्रेस पक्षातील प्रवेशा मुळे पक्षातील तरूनां मध्ये चैतन्य पसरले असल्याचे कार्यकर्ते सांगत आहेत.


































