अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीने दिला उपोषणाचा इशारा
लातूर जिल्हातिल.देवणी प्रतिनिधी भारतीय स्टेट बँक शाखा देवणी जिल्हा लातूर येथे शाळेच्या मुलांसाठी नवीन खाते उघडण्यासाठी बेकायदेशीर खोट्यारीत्याने व बळजबरीने सर्टिफिकेट ऑफ इन्शुरन्सचे एक हजार रुपये घेऊन शाळेच्या विद्यार्थ्यांची व जनतेची फसवणूक करणाऱ्या बँक मॅनेजर देवणी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करून निलंबित करावे तक्रार देण्यात आली.
सविस्तर माहिती अशी की, हुजैफा महमदरफी सौदागर यांनी भारतीय स्टेट बँक शाखा देवणी येथे नवीन खाता उघडल्याने खाता क्रमांक ४३१८३०७०६४८ असून संबंधित शाखेचे मॅनेजर यांनी बेकायदेशीर खोट्यारीत्याने व बळजबरीने खाता उघडण्यासाठी सर्टिफिकेट ऑफ इन्शुरन्सचे एक हजार रुपये घेऊन शाळेच्या विद्यार्थ्यांची
शासनाची फसवणूक केल्याने माहिती अधिकार अर्ज करून नवीन खाता उघडण्यासाठी एक हजार रुपयांचे सर्टिफिकेट ऑफ इन्शुरन्स घेणे कोणत्या नियम व कायदा व शासन परिपत्रक अनिवार्य आहे त्या नियम व कायद्याची सत्यप्रत मागितली होती ती त्यांनी दिली नाही त्यामुळे प्रथम अपील दाखल केल्याने अपिलीय
अधिकारी यांनी दहा दिवसात विनामूल्य माहिती देण्याचे आदेश देऊनही जन माहिती अधिकारी यांनी अद्याप कसलीच माहिती शासन परिपत्रक व नियम कायद्याची माहिती व सत्यप्रत दिली नाही यावरून असे सिद्ध होते की नवीन खाता उघडते वेळेस एक हजार रुपयाचा सर्टिफिकेट ऑफ इन्शुरन्स घेणे अनिवार्य नाही.
यामुळे भारतीय स्टेट बँक शाखा देवणी चे बँक मॅनेजर यांनी बेकायदा व बळजबरीने एक हजार रुपये सर्टिफिकेट ऑफ इन्शुरन्स घेण्यास मजबूर करून शाळेच्या विद्यार्थ्यांची व शासनाची फसवणूक केली आहे अशा किती लोकांची अद्याप फसवणूक केली आहे त्याची कसून चौकशी करून चौकशी अहवालाची सत्यप्रत अर्जदार यांना देऊन संबंधित बँक मॅनेजर विरुध्द गुन्हा नोंद करून निलंबित करावे
अन्यथा बेमुदत आमरण उपोषण करण्यात येईल अशी तक्रार अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे संस्थापक अध्यक्ष सौदागर महमदरफी यांनी रिझर्व बँक ऑफ इंडिया मुंबई व दिल्ली येथे व भारतीय स्टेट बँक मुंबई येथे लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे.


































